Pune Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून हिंजवडीत रक्तरंजित थरार! तरुणाची हत्या, तरुणीवरही जीवघेणा हल्ला

पुण्यातील हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादाचे भीषण रूप समोर आले आहे.

Pune Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून हिंजवडीत रक्तरंजित थरार! तरुणाची हत्या, तरुणीवरही जीवघेणा हल्ला

पुणे: पुण्यातील हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादाचे भीषण रूप समोर आले आहे. एका तरुणाने लोखंडी रॉडने हल्ला करून तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (६ ऑगस्ट) घडली. या हल्ल्यात एक तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र, उरुळी कांचन पोलिसांनी तत्परता दाखवत पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदी करून संशयिताला वाहनासह ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी दिनेश महादेव झांबरे (वय 23, रा. पळशी, ता. पंढरपूर) याचे एका तरुणीसोबत शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. पुढील शिक्षणासाठी दोघेही पुण्यात आल्यानंतर त्यांच्या आयुष्यात बदल झाला. संबंधित तरुणीचे शिक्षणादरम्यान दुसऱ्या एका तरुणाशी जवळीक वाढल्याचा संशय दिनेशला होता. याच संशयातून त्याच्यात प्रचंड संताप निर्माण झाला होता.

हेही वाचा: Crime News : प्रेमविवाहात धोका! लग्नानंतर मारहाण, गर्भपात, अतोनात छळ, देहव्यवसायाची जबरदस्ती; पीडितेची न्यायासाठी पोलीस अधीक्षकांकडे धाव

गुरुवारी आरोपीने संबंधित तरुण आणि तरुणी राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी वाद घातल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. काही क्षणांतच हा वाद हिंसक झाला आणि आरोपीने जवळील लोखंडी रॉडने दोघांवर सपासप वार केल्याचा आरोप आहे. या भीषण हल्ल्यात तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. हिंजवडी पोलिसांनी तातडीने सर्व पोलीस यंत्रणेला सतर्क करत संशयिताचा शोध सुरू केला. आरोपी पंढरपूरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर उरुळी कांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदी केली. वाहनांची कसून तपासणी सुरू असताना संशयित आरोपीला त्याच्या वाहनासह ताब्यात घेण्यात आले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number