Crime News : क्राइम थ्रिलर सिनेमालाही मागे टाकेल अशी क्रूरता! पत्नीचं डोकं फ्रीजमध्ये, मृतदेहाशेजारीच जेवण; सहा महिन्यांपूर्वीच्या लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट

गुवाहाटी : गुवाहाटीमधील एका फ्लॅटमध्ये 25 वर्षीय विवाहित महिलेची कथित हत्या करण्यात आली. पोलिसांनी तिचे धडापासून वेगळे केलेले डोके रेफ्रिजरेटरमधील एका पॉलिथिन पिशवीत ठेवलेल्या अवस्थेत शोधून काढले. या प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या महिलेच्या पतीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून, त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे समजते. मृत महिलेची ओळख रिया तालुकदार गोस्वामी अशी पटली असून, तिचे रमानुजन गोस्वामी […]

Crime News : क्राइम थ्रिलर सिनेमालाही मागे टाकेल अशी क्रूरता! पत्नीचं डोकं फ्रीजमध्ये, मृतदेहाशेजारीच जेवण; सहा महिन्यांपूर्वीच्या लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट

गुवाहाटी : गुवाहाटीमधील एका फ्लॅटमध्ये 25 वर्षीय विवाहित महिलेची कथित हत्या करण्यात आली. पोलिसांनी तिचे धडापासून वेगळे केलेले डोके रेफ्रिजरेटरमधील एका पॉलिथिन पिशवीत ठेवलेल्या अवस्थेत शोधून काढले. या प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या महिलेच्या पतीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून, त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे समजते. मृत महिलेची ओळख रिया तालुकदार गोस्वामी अशी पटली असून, तिचे रमानुजन गोस्वामी यांच्याशी सुमारे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. हे जोडपे हाटीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसिष्ठपूर भागातील एका फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते. हे धक्कादायक प्रकरण तेव्हा उजेडात आले, जेव्हा या जोडप्याच्या अनुपस्थितीमुळे शेजाऱ्यांना शंका आली आणि अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार त्यांनी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्यावर रहिवाशांनी अधिकाऱ्यांना याची सूचना दिली. हे जोडपे गेल्या दोन दिवसांपासून कोणालाही दिसले नव्हते, त्यांचे फोनही बंद होते. त्यानंतर पोलीस पथकांनी त्या अपार्टमेंटची झडती घेतली आणि रियाचा मृतदेह हस्तगत केला. तिचे डोके धडापासून वेगळे करून एका पॉलिथिन पिशवीत गुंडाळून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले आढळले. तपास पथकाने घटनास्थळावरून एक शस्त्रही जप्त केले आहे. ज्याचा वापर या गुन्ह्यात झाला असावा, असा संशय आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासावरून असे दिसून येते की, रविवारी रात्री मृतदेह सापडण्यापूर्वी सुमारे 48 तास आधी ही हत्या झाली होती. गुवाहाटी पोलीस आयुक्तालयाचे एडीसीपी (पूर्व) अनुराग शर्मा यांनी दुजोरा दिला की, रियाचा पती रामानुजन गोस्वामी हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गोस्वामीने अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करली आणि आपला गुन्हा कबूल केला. तपास अधिकारी आता या कथित हत्येभोवतीची परिस्थिती आणि या घटनेमागील कारणांचा तपास करत आहेत. हत्येपूर्वी या जोडप्यामध्ये मोठा वाद झाला होता, असे समजते. हा वाद हत्येशी संबंधित होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा : Buldhana News : बुलढाण्यात स्त्रीभ्रूण हत्येचं मोठं रॅकेट सक्रिय?; गर्भलिंग निदानप्रकरणी डॉक्टरांना बजावल्या नोटीसा, व्हिडीओ समोर

हत्येनंतर काय घडले याबद्दल पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. रमनुजन गोस्वामी याने रियाच्या मृतदेहाशेजारी बसून खाण्यापिण्याचे काम केले. तसेच तिच्या शरीराचे तुकडे करून ते कुत्र्यांना खाऊ घालण्याचाही त्याने कट रचला होता, असे तपासात आढळून आले आहे. आपल्या पत्नीचे मोबाईल फोन फोडून नष्ट केल्याची कबुलीही त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिया फॅन्सी बाजारमधील 'एसी मार्केट' परिसरातील एका बुटीकमध्ये काम करत होती. तिला आई-वडील नव्हते आणि तिच्या पश्चात केवळ तिचा भाऊ हयात आहे. त्यामुळे तिच्या मृत्यूनंतर तिचा भाऊ हाच तिचा एकमेव जवळचा नातेवाईक उरला आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, अपार्टमेंटमधील पुरावे आणि शवविच्छेदन अहवालाची तपासणी केल्यानंतर अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

रियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. घटनेचा क्रम जुळवताना तपास अधिकारी शवविच्छेदनाचा अहवाल, फ्लॅटमधून मिळालेले फॉरेन्सिक पुरावे आणि आरोपीचा जबाब यांवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे. तपासादरम्यान पोलिसांनी रामानुजनच्या पार्श्वभूमीबाबतची माहितीही उघड केली आहे. तो अमली पदार्थांच्या आहारी गेला होता आणि यापूर्वी त्याने एका पुनर्वसन केंद्रात (रिहॅबिलिटेशन सेंटर) सुमारे तीन महिने घालवले होते. त्याचे मूळ गाव धुबरी जिल्ह्यातील गौरीपूर येथे आहे. या घटनेमुळे परिसरातील रहिवासी हादरले असून, पोलीस हत्येची कारणे आणि त्यापूर्वी घडलेल्या घटनांचा तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number