इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे जागतिक पातळीवर गुंतवणूकदार सावध झाले आहेत. ज्यामुळे भारतातील सोन्याच्या भावात किंचित बदल दिसून आला आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि भारतीय रुपयाच्या मूल्यातील बदलांमुळे चांदीच्या भावात चढ-उतार होत आहेत. भारतीय बाजारात सोन्याच्या घरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज सोन्याचे दर जाणून घ्या… आज 07 मार्च 2026 रोजी भारतातील सोन्याचे दर अत्यंत उच्चांकी पातळीवर असून, 24 कॅरेट सोन्याचा दर (10 ग्रॅम) अंदाजे 1,61,000 ते 1,65,000 च्या दरम्यान आहे. 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर अंदाजे 14,700 – 14,860 प्रति ग्रॅम (1,47,000-1,48,000 प्रति 10 ग्रॅम) च्या आसपास आहे, ज्यात जागतिक अनिश्चिततेमुळे मोठी वाढ झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांनुसार मुंबईत 24 कॅरेट सोनं 1,62,330 रुपये, पुण्यात 1,62,490 रुपये तर नाशिक 1,61,150 रुपये आणि नागपूरमध्ये 1,61,120 च्या आसपास आहेत. तसेच 22 कॅरेट सोने (10 ग्रॅम) अनुक्रमे सुमारे 1,49,000 – 1,54,000 च्या दरम्यान उपलब्ध आहे. 7 मार्च 2026 रोजी भारतातील चांदीची किंमत जवळजवळ 2,84,900 ते 2,90,000 प्रति किलोग्राम आहे.
जाणून घ्या शहरानुसार सोन्याचे दर कसे आहेत?
स्थानिक कर आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसमुळे मुंबई, पुणे, जळगाव शहरांनुसार किमतीत अल्प फरक असू शकतो. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,49,300 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,62,330 आहे. त्याचसोबत पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 1,49,000 -1,50,000 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,62,490 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,53,650 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा दर 1,61,120 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,47,740 रुपये आहे, तसेच 24 कॅरेट सोन्याचा दर 1,61,150 रुपये आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये स्थानिक कर, जागतिक अनिश्चितता आणि मागणीमुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने तेजी दिसून येत आहे.