ISI Spying Module : मोठ्या हेरगिरी रॅकेटचा पर्दाफाश! फोटोला 4000 तर व्हिडिओला इतके मिळत होते पाकिस्तानकडून पैसे

एका स्थानिक बीट कॉन्स्टेबलला काही संशयास्पद हालचाली दिसल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा धागा पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी अनेक ठिकाणांहून कॅमेरे जप्त केले आहेत.
ISI Spying Module : मोठ्या हेरगिरी रॅकेटचा पर्दाफाश! फोटोला 4000 तर व्हिडिओला इतके मिळत होते पाकिस्तानकडून पैसे

ISI Spying Module in Ghaziabad : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संस्थेशी संबंधित असलेल्या एका मोठ्या जासूसी रॅकेटचा (Spy Module) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी 8 जणांना अटक केली असून, आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपींची संख्या 22 वर पोहोचली आहे. हे रॅकेट भारतीय लष्कराची आणि रेल्वे स्थानकांसारख्या संवेदनशील ठिकाणांची गोपनीय माहिती आणि थेट चित्रीकरण पाकिस्तानातील हस्तकांना पुरवत असल्याचे तपासात समोर आले आहे.

असे चालायचे हेरगिरीचे जाळे
या हेरगिरी मॉड्यूलचा मुख्य म्होरक्या सोहेल मलिक मेरठ येथील असून, त्याला मदत करणारी महक उर्फ सने इरम ही महिला देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारच्या मुजफ्फरपूरचा रहिवासी असलेला नौशाद अली उर्फ लालू याला फरीदाबादमधून अटक करण्यात आली. नौशाद हा तांत्रिक ज्ञान असलेल्या (मोबाईल रिपेअरिंग, कॉम्प्युटर आणि CCTV ऑपरेटर) गरीब तरुणांना पैशांचे आमिष दाखवून या रॅकेटमध्ये ओढण्याचे काम करायचा. संशय टाळण्यासाठी या टोळीत महिलांचाही समावेश करण्यात आला होता, ज्यांच्याकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही.

माहितीच्या बदल्यात मिळायचे लाखो रुपये
तपासात असे निष्पन्न झाले आहे की, हे आरोपी रेल्वे स्थानके आणि सुरक्षा दलांच्या तळांचे फोटो आणि व्हिडिओ काढून व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) द्वारे पाकिस्तानातील हँडलर्सना पाठवत असत. या कामासाठी त्यांना मिळणारी रक्कम मोठी होती. प्रत्येक संवेदनशील फोटोसाठी 4,000 ते 6,000 रुपये दिले जात असत. एका व्हिडिओ क्लिपसाठी सोहेल मलिक सारख्या प्रमुख सदस्यांना 10,000 रुपयांपर्यंत मोबदला मिळायचा. नवीन तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी आणि त्यांना पैसे वाटण्यासाठी सोहेल आणि महक हे स्वतंत्रपणे काम पाहत असत.

हेही वाचा – Kashmiri Muslims Support Iran : यांना काय म्हणावं? इराणच्या मदतीसाठी काश्मिरी मुस्लीम सरसावले! महिलांनी दान केले सोन्याचे दागिने

लष्कराच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण (Live Streaming)
हे रॅकेट केवळ फोटो काढण्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी दिल्ली कॅंट आणि सोनीपत रेल्वे स्थानकांसारख्या मोक्याच्या ठिकाणी गुप्तपणे CCTV कॅमेरे बसवले होते. या कॅमेऱ्यांचा मुख्य उद्देश भारतीय लष्कराची वाहतूक, सैनिकांची हालचाल आणि शस्त्रास्त्रांची ने-आण यावर 'लाईव्ह' लक्ष ठेवणे हा होता. आश्चर्याची बाब म्हणजे, या कॅमेऱ्यांचे अ‍ॅक्सेस थेट पाकिस्तानात बसलेल्या हँडलर्सना देण्यात आले होते, जेणेकरून ते तिथूनच सर्व हालचाली पाहू शकतील. दिल्ली ते काश्मीर दरम्यान असे सुमारे 50 कॅमेरे बसवण्याची त्यांची योजना होती.

स्थानिक कॉन्स्टेबलच्या सतर्कतेने रॅकेट उघड
एका स्थानिक बीट कॉन्स्टेबलला काही संशयास्पद हालचाली दिसल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा धागा पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी या ठिकाणांहून कॅमेरे जप्त केले असून ते फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. आरोपींचे मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले असून, त्यातून पाकिस्तानातील अनेक नंबर आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स पोलिसांच्या हाती लागले आहेत. या कारवाईमुळे भारतीय लष्कराच्या हालचालींची गोपनीय माहिती शत्रू देशाकडे जाण्यापासून रोखण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मात्र, आणखी काही लोक अशा प्रकारच्या कारवाया करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील काळात देशांतर्गत सुरक्षा आणि सीमासुरक्षा दलांना मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते.

हेही वाचा – Nora Fatehi Song Controvercy: नोरा फतेहीवर 'वर्क परमिट'चा गैरफायदा घेतल्याचा आरोप; 10 वकिलांची टीम सरसावली, अभिनेत्रीची भारतातून होणार हकालपट्टी?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version