Raigad Crime : रायगडमध्ये कौटुंबिक वादाचा थरारक शेवट! आई-वडिलांचं भांडण सोडवण्यासाठी मुलगा मध्ये पडला, पण वडिलांनीच…

सख्या बापाने आपल्या तरुण मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना रायगडच्या पोलादपुरमध्ये घडली आहे. पोलादपूर तालुक्यातील ओंबळी गावातील मूळ रहिवासी असलेल्या कुटुंबातील सचिन बजरंग चिकणे याने स्वतःच्याच तरुण मुलाला धारदार शस्त्राने रक्तबंबाळ करून खून केला. पोलादपूर शहरानजीक लोहारे देऊळकोंड येथे ही घटना घडल्यानंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली. आई वडिलांच्या भांडणात मुलगा वडिलांना समजावण्या करीता गेला, यावेळी […]

Raigad Crime : रायगडमध्ये कौटुंबिक वादाचा थरारक शेवट! आई-वडिलांचं भांडण सोडवण्यासाठी मुलगा मध्ये पडला, पण वडिलांनीच…
Raigad Crime

सख्या बापाने आपल्या तरुण मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना रायगडच्या पोलादपुरमध्ये घडली आहे. पोलादपूर तालुक्यातील ओंबळी गावातील मूळ रहिवासी असलेल्या कुटुंबातील सचिन बजरंग चिकणे याने स्वतःच्याच तरुण मुलाला धारदार शस्त्राने रक्तबंबाळ करून खून केला.

पोलादपूर शहरानजीक लोहारे देऊळकोंड येथे ही घटना घडल्यानंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली. आई वडिलांच्या भांडणात मुलगा वडिलांना समजावण्या करीता गेला, यावेळी वडीला सचिन बजरंग चिकणे याने स्वयंपाक घरातील सुरीने मुलाच्या छातीत डाव्या बाजुला वार केले. यात गंभीर दुखापत झालेल्याने मुलाचा जागीच मृत्यु झाला.

साहिल चिकणे वय वर्ष 24 असे मृत मुलाचे नाव आहे. आरोपी वडील सचिन चिकणे याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी मृत मुलाची आई संध्या चिकणे हिने पोलादपुर पोलिस ठाण्यात या बाबत तक्रार दिली आहे. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात मृत साहिल चिकणे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सायंकाळी उशिरा पोलिसांनी दिली. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक विजय सुर्वे यांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण करीत गुन्ह्याचे ठिकाण असलेले घर संरक्षित केले. फॉरेन्सिक टीमकडून गुन्ह्याचे कारण व घटनाक्रम याचा संदर्भ तसेच त्यावेळी घडलेल्या शक्यतांचा अभ्यास सुरू केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number