मुंबई, ८ जून,२०२३, प्रतिनिधी :
आदिपुरुष या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता द काश्मीर फाईल्स आणि कार्तिकेय या चित्रपटांचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी आदिपुरुष या चित्रपटाची १०,००० तिकिटे दान करणार असल्याचे ठरवले आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवर अधिकृत पोस्ट सामायिक केली आहे.
” ‘आदिपुरुष’ हा चित्रपट सर्वानी साजरा करावा असा आहे. श्रीरामावरील माझी भक्ती आणि श्रद्धा यामुळे मी ‘आदिपुरुष’साठी १०,००० तिकिटे विकत घेण्याचे ठरवले आहे आणि ते तेलंगणातील सरकारी शाळा, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना दान करायचे आहे. जर तुम्हाला तिकिटे मिळवायची असतील तर कृपया खाली दिलेला फॉर्म भरा. ‘जयश्रीराम’ चा जयघोष सर्व दिशांना घुमू दे !”, असा मजकूर त्यांनी लिहिला आहे.
#Adipurush is a once in a lifetime movie which needs to be celebrated by one and all. Out of my devotion for Lord Shree Ram, I have decided to give 10,000+ tickets to the Government schools, Orphanages & Old Age Homes across Telangana for free. Fill the Google form with your… pic.twitter.com/1PbqpW9Eh6 — Abhishek Agarwal ?? (@AbhishekOfficl) June 7, 2023
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.