Baramati Crime : गुंगीचे औषध दिले…सिमेंटच्या थडग्यात कोंडलं…डायल 112 मुळे वाचला पीडित पतीचा जीव; पत्नीने रचलेला कट पोलिसांनी उधळला

Baramati Crime : गुंगीचे औषध दिले…सिमेंटच्या थडग्यात कोंडलं…डायल 112 मुळे वाचला पीडित पतीचा जीव; पत्नीने रचलेला कट पोलिसांनी उधळला

बारामती : बारामतीत पत्नीने पतीला जिवंत पुरण्याचा प्रकार उघडकीस आलेल्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. आरोपी पत्नीने आपल्या पतीला ठार मारून घरातच कायमचे पुरून टाकण्याचा कथित कट रचला होता. मात्र, डायल 112 वर आलेल्या एका अज्ञात फोनमुळे हा थरारक कट पोलिसांनी उधळून लावत पतीचा जीव वाचवला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात आरोपी पत्नीविरोधात 313/2026 अन्वये बीएनएस कलम 109(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 जुलैपर्यंत मिळालेली पोलीस कस्टडी संपल्यानंतर पोलिसांनी आज आरोपी महिलेला बारामती न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी तपासा कामी न्यायालयाकडे पोलीस कस्टडी मागितली होती. यावर न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे.

हेही वाचा : Gadchiroli: गडचिरोलीत आश्रमशाळेत मध्यरात्री सर्पदंशाचा थरार; 3 विद्यार्थिनींचा मृत्यू, 12 विद्यार्थी जखमी, नेमकं काय घडलं? 

पीडित पती प्रविण प्रकाश जगताप यांना या घटनेसंदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, मला माझी पत्नी गुंगीचे औषध देत होती. माझा करोडो रुपयांचा इन्शुरन्स आहे. त्यामुळे मला माझ्या पत्नीने जीव मारण्याचा कट रचला होता, असा गंभीर आरोप पती प्रकाश जगताप यांनी केला आहे. तसेच माझी दोन्ही मुले सासरचे घेऊन गेले आहेत. माझ्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे माझ्या मुलांना माझ्याकडे स्वाधीन करावे, अशी मागणी प्रविण प्रकाश जगताप यांनी केली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version