अग्निपथ योजनेवर काँग्रेसचा आक्षेप

अग्निपथ योजनेवर काँग्रेसचा आक्षेप

केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी नवीन घोषणा केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. तसेच या भरती अंतर्गत भरती होणाऱ्या सैनिकांना अग्नवीर असे नाव देण्यात येणार असून येत्या ऑगस्टपासून ही भरती होण्याची शक्यता आहे.

मात्र, अग्निपथ योजनेवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. नवी लष्करी भरती हा लष्कराच्या अभिमानाशी खेळ अशी भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतली आहे.

‘भारताला सध्या दोन आघाड्यांवर आव्हान असताना अग्निपथ योजना सशस्त्र  दलांची कार्यक्षणता कमी करू शकते. त्यामुळे या सरकारने लष्कराचा अभिमान आणि परंपरेशी खेळणे थांबवावे,’ असे ट्विट राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.

कशी आहे अग्निपथ योजना?

  • भारतीय लष्कराच्या तीनही दलात चार वर्षांसाठी तरुणांची भरती केली जाणार
  • चार वर्षांनंतर ८० टक्के तरुणांची सेवा समाप्त केली जाणार
  • २० टक्के सैनिकांना तिन्ही सेना दलात काम करण्याची पुन्हा संधी मिळणार
  • अग्निवीरांना चांगले वेतन देण्यात येणार
  • सैन्यातून बाहेर पडताना चांगली रक्कम दिली जाईल
  • सेवेदरम्यान बलिदान दिले तर कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत मिळणार
  • अपंगत्व आल्यास ४८ लाख रुपयांची मदत

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version