Mumbai BMC Office : पालिका वार्ड ऑफिससमोर कंत्राटदारांमध्ये हाणामारी; एकमेकांवरील चाकू हल्ल्यात दोघेही जखमी, एका टेंडरवरून वाद झाल्याचा अंदाज

Mumbai BMC Office : पालिका वार्ड ऑफिससमोर कंत्राटदारांमध्ये हाणामारी; एकमेकांवरील चाकू हल्ल्यात दोघेही जखमी, एका टेंडरवरून वाद झाल्याचा अंदाज

मुंबई : मुंबई महापालिकेच्या एफ नॉर्थ वार्ड ऑफिससमोर दोन कंत्राटदारांमध्ये हाणामारी झाली आहे. तसेच दोघांनीही एकमेकांवर चाकूने हल्ला केला आहे. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही कंत्राटदारांकडे चाकू होते. एकाच्या पोटाला आणि दुसऱ्याच्या पायावर चाकुने वार झाल्याची पोलिसांनी माहिती दिली. एका टेंडरवरून दोघांमध्ये हाणामारी झाली असावी असा संशय पोलिसांची व्यक्त केला आहे. माटुंगा पोलिसांनी दोघांच्याही विरोधात हत्येचा प्रयत्न केलाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. मुंबई महापालिकेकडून कंत्राट मिळवण्यासाठी कंत्राटदारांमध्ये चढा-ओढ असते. पण त्यातून अशा प्रकारे परस्परांवर जीवघेणा हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पोलीस तपासातून बऱ्याच गोष्टी समोर येतील.

हेही वाचा : BMC Alert Monsoon Diseases : पावसाळ्यात मुंबईकरांच्या आरोग्यावर संकट! डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; प्रशासन अलर्ट

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version