Vijay Hazare Trophy: मोठी बातमी! मुंबई संघाच्या कर्णधारपदात अचानक बदल; आता ‘या’ खेळाडूकडे सोपवण्यात आली धुरा

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) 5 जानेवारी रोजी अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती दिली. यापूर्वी शार्दुल ठाकूर संघाचे नेतृत्व करत होता, मात्र दुखापतीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले आहे.
Vijay Hazare Trophy: मोठी बातमी! मुंबई संघाच्या कर्णधारपदात अचानक बदल; आता ‘या’ खेळाडूकडे सोपवण्यात आली धुरा

Vijay Hazare Trophy: भारतीय क्रिकेट संघातून एक मोठी बातमी समोर येत आहे. विजय हजारे ट्रॉफी (VHT) मध्ये मुंबई क्रिकेट संघाने आपल्या नेतृत्वामध्ये मोठा बदल केला आहे. अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यर याच्याकडे मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शार्दुल ठाकूर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

श्रेयस अय्यरवर पुन्हा विश्वास

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) 5 जानेवारी रोजी अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती दिली. विजय हजारे ट्रॉफीच्या उर्वरित लीग सामन्यांसाठी श्रेयस अय्यर मुंबईचे नेतृत्व करेल. यापूर्वी शार्दुल ठाकूर संघाचे नेतृत्व करत होता, मात्र दुखापतीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले आहे. अय्यरला आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा दांडगा अनुभव असल्याने, मुंबईचे स्थान मजबूत करण्यासाठी व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दर्शवला आहे.

हेही वाचा – Shreyas Iyer : श्रेयस अय्यरला टीम इंडियाचे उपकर्णधारपद मिळणार, पण; आधी पूर्ण करावी लागेल, BCCI ची 'ही' मोठी अट

बीसीसीआयच्या निर्णयाकडे लक्ष

श्रेयस अय्यरची न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. मात्र, त्याचे संघात असणे हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे. सध्या तो 'सेंटर ऑफ एक्सलन्स' (CoE) मध्ये फिटनेस चाचणीच्या प्रक्रियेत आहे. जर श्रेयस फिट घोषित झाला, तर तो 11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत उपकर्णधार म्हणून दिसेल. अशा परिस्थितीत, 12 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीच्या नॉकआउट सामन्यांसाठी मुंबईला नवा कर्णधार शोधावा लागेल.

हेही वाचा – BCCI vs BCB : टी-20 विश्वचषकापूर्वी भारत-बांगलादेशमध्ये तणाव! मुस्तफिजूरच्या मुद्द्यावरून बांगलादेश क्रिकेट बोर्डचा नवीन ड्रामा

काय म्हणाले एमसीए सचिव?

एमसीएचे सचिव उन्मेष खानविलकर यांनी स्पष्ट केले की, सध्या श्रेयस उर्वरित दोन लीग सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करेल. बीसीसीआयकडून त्याच्या फिटनेसबाबत आणि आंतरराष्ट्रीय उपलब्धतेबाबत स्पष्टता मिळाल्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ. दरम्यान, बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी शुभमन गिलला कर्णधार म्हणून घोषित केले आहे. तथापी, श्रेयस अय्यर फिट झाल्यास तो या मालिकेत उपकर्णधारपदाची भूमिका बजावेल.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version