Baramati Crime: ‘अथर्व मला शरीरसंबंध ठेवण्यासाठी गोळी देणार आहे’; आईला शेवटचा फोन, प्रियकरासोबत गेली अन् परतलीच नाही

बारामतीमध्ये बीएस्सी अ‍ॅग्रीचे शिक्षण पूर्ण करून एमपीएससीची तयारी करणाऱ्या 23 वर्षीय तरुणीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

Baramati Crime: ‘अथर्व मला शरीरसंबंध ठेवण्यासाठी गोळी देणार आहे’; आईला शेवटचा फोन, प्रियकरासोबत गेली अन् परतलीच नाही

बारामती: बारामतीमध्ये बीएस्सी अ‍ॅग्रीचे शिक्षण पूर्ण करून एमपीएससीची तयारी करणाऱ्या 23 वर्षीय तरुणीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तरुणीचा प्रियकर अथर्व मेहर याच्यावर कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले असून, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

6 ऑगस्ट रोजी संबंधित तरुणी अथर्वसोबत घराबाहेर गेली होती. त्याच दिवशी सायंकाळी तिने आईला फोन केला होता. त्यावेळी अथर्व तिला घरी घेऊन जाणार असल्याचे आणि शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी काही गोळी देणार असल्याचे तिने सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

हेही वाचा: Buldhana: ‘पदाचा राजीनामा दे, अन्यथा तुला संपवू…’; विरोधकांचा सततचा त्रास अन् सरपंचाने उचललं टोकाचं पाऊल

यानंतर काही तासांतच तरुणीची प्रकृती अचानक बिघडली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी प्रियकरावर संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीत तरुणीच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार, अथर्व हा यापूर्वीही संबंधित तरुणीला काही गोळ्या किंवा औषधे देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या औषधांचा प्रकार काय होता, ते तिला कोणत्या कारणासाठी देण्यात आले आणि त्याचा तिच्या प्रकृतीशी काही संबंध होता का, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप तपासाचा विषय आहे. वैद्यकीय अहवाल, शवविच्छेदन अहवाल आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मृत्यूमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Dhule Crime: साक्रीत पत्नीची दगडाने ठेचून हत्या; घटनेनंतर अवघ्या दोन तासांत संशयित पती पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, आपल्या मुलीच्या मृत्यूला अथर्व मेहर जबाबदार असल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. बारामती शहर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, तपासातून या संपूर्ण घटनेमागील नेमके वास्तव समोर येणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number