आशिया कप 2025 च्या सुपर-4 सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या हाय-व्होल्टेज सामन्यादरम्यान एका क्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.पाकिस्तानी सलामीवीर साहिबजादा फरहानने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
सामना सुरू असताना 10 व्या ओव्हरवर अक्षर पटेलच्या बॉलवर फरहानने एक शानदार पुल शॉट खेळला आणि मिडविकेटवर षटकार मारला. या शॉटसह, त्याने फक्त 34 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, ज्यामध्ये पाच चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.
हेही वाचा – IND vs PAK: कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकली; भारत प्रथम गोलंदाजी करणार
त्यानंतर फरहानने त्याच्या बॅटने बंदुकीने गोळीबार करण्याचे अनुकरण केले, ज्यामुळे स्टेडियमचे प्रेक्षक आणि समालोचक आश्चर्यचकित झाले. हा उत्सव काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. समालोचकांनी आणि चाहत्यांनी याला AK-47 सेलिब्रेशन असेही म्हटले.
हेही वाचा – India V/S Pakistan: ICC ने पाकिस्तानची जिरवली, ऍन्डी पायक्रॉफ्ट पुन्हा रेफरी
दरम्याने कालच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नंतर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली. भारताने 18.5 षटकांत चार विकेट्सच्या मोबदल्यात 174 धावा करून सामना जिंकला.