Crime : मोठा मुलगा दुसऱ्या खोलीत, बाहेर आई-बाबा अन् बहिणीने उचललं टोकाचं पाऊल; पोलिस तपासात सून…; परिसरात खळबळ

राजस्थानमधील अजमेरमध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आदर्श नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील गढी मलियान परिसरात शनिवारी रात्री ही घटना घडली आहे.
Crime : मोठा मुलगा दुसऱ्या खोलीत, बाहेर आई-बाबा अन् बहिणीने उचललं टोकाचं पाऊल; पोलिस तपासात सून…; परिसरात खळबळ

अजमेर : राजस्थानमधील अजमेरमध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आदर्श नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील गढी मलियान परिसरात शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अशोक शर्मा (वय59), त्यांची पत्नी (वय52) आणि मुलगी दीक्षा शर्मा (वय20) या तिघांनीही विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या केली आहे.

घरात मुलगा होता, पण बाहेर घडला धक्कादायक प्रकार
रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान तिघांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने अजमेर येथील एका रुग्णालयात दाखल केले. मात्र,डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले.

हेही वाचा-Crime : आजोबांना ठार करुन अंत्यसंस्कारही उरकले! 17 वर्षीय नातीचा बॉयफ्रेंडसोबत मिळून कट; अखेर कपडे धुताना….

या घटनेची माहिती मिळताच आदर्श नगर पोलीस ठाण्याचे सीआ ओमप्रकारश मीणा पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करुन तपास ही सुरु केला आहे. एकाच कुटुंबातील तीन जणांनी केलेल्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेच्या वेळी अशोक शर्मा यांचा मुलगा गौरवही घरातील खोलीत होता. खरं तर गौरव हा जयपूरमध्ये वास्तव्यास आहे आणि दोन दिवसांपूर्वीच अजमेरला आला होता. तर कुटुंबातील सून सध्या तिच्या माहेरी गेली होती. मृत अशोक शर्मा हे फर्निचरते काम करत होते.

घटनेनं परिसरात खळबळ
या घटनेमागील नेमके कारण काय होते, ते अजूनही स्पष्ट झालेले नाही. तिघांनी विषारी पदार्थ घेऊन असे का केले, याचा पोलीस तपास करत आहे. पोलिसांकडून कुटुंबातील अन्य सदस्य आणि आसपासच्या नागरिकांची चौकशी केली जात आहे. सध्या तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पोलीस तपास आणि अहवालानंतरच मृत्यूच्या परिस्थितीबाबतची अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. आई-वडील आणि मुलीच्या मृत्यूने कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला असून,परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version