Phuket Delhi Flight: गांजा पिऊन विमान उडवलं? एअर इंडियाच्या फुकेत-दिल्ली फ्लाइटच्या पायलटची ड्रग टेस्ट पॉझिटिव्ह

फुकेत-दिल्ली AI2379 विमानातील टर्ब्युलन्सनंतर कॅप्टनची कन्फर्मेटरी ड्रग टेस्ट गांजासाठी पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे.

Phuket Delhi Flight: गांजा पिऊन विमान उडवलं? एअर इंडियाच्या फुकेत-दिल्ली फ्लाइटच्या पायलटची ड्रग टेस्ट पॉझिटिव्ह

नवी दिल्ली: एअर इंडियाच्या फुकेत-दिल्ली विमानातील टर्ब्युलन्सच्या घटनेनंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. AI2379 या विमानाच्या कॅप्टनची अमली पदार्थ सेवनासंदर्भातील कन्फर्मेटरी चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या चाचणीत गांजा म्हणजेच मारिजुआनाशी संबंधित घटक आढळल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विमान वाहतूक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

4 ऑगस्ट रोजी फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या Airbus A320 विमानाला हवेत अचानक जोरदार टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला होता. या घटनेदरम्यान विमानाची उंची काही काळात सुमारे 300 फूटांनी कमी झाली. अचानक झालेल्या या हालचालीमुळे विमानातील प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. या घटनेत सुमारे 20  प्रवासी आणि चार केबिन क्रू सदस्य जखमी झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा: Columbia Earthquake : कोलंबियामध्ये विनाशकारी भूकंप; 20 हून अधिक इमारती कोसळल्या, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

घटनेनंतर विमानातील दोन्ही वैमानिकांची नियमानुसार ड्रग स्क्रीनिंग करण्यात आली. यामध्ये कॅप्टनच्या प्राथमिक चाचणीचा निकाल ‘नॉन-निगेटिव्ह’ आला होता. त्यानंतर नमुना पुढील पुष्टीकरणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. आता या कन्फर्मेटरी चाचणीचा निकाल गांजा सेवनासाठी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणामुळे वैमानिकांच्या वैद्यकीय तपासणीसह विमान प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, ड्रग टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचा अर्थ संबंधित वैमानिक विमान उडवताना नशेतच होता, असा थेट निष्कर्ष काढता येत नाही. चाचणीमध्ये पदार्थाचे अस्तित्व आढळणे आणि त्या पदार्थाचा उड्डाणाच्या वेळी वैमानिकाच्या क्षमतेवर परिणाम झाला होता का, या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत.

दरम्यान, विमान अपघात तपास ब्युरो म्हणजेच AAIB कडून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. तपासामध्ये विमानाची तांत्रिक स्थिती, उड्डाणाची माहिती, संबंधित नोंदी, वैद्यकीय अहवाल, वैमानिक आणि क्रूची माहिती तसेच इतर मानवी घटकांचा अभ्यास केला जात आहे.

या घटनेनंतर संबंधित वैमानिकाला ड्युटीपासून दूर ठेवण्यात आल्याची माहिती आहे. अंतिम तपासात ड्रग टेस्टचा निकाल, टर्ब्युलन्सची परिस्थिती आणि विमानातील घडामोडी यांचा परस्पर संबंध तपासला जाणार आहे.

हेही वाचा: Missile Attack On Vela Nova : ओमानच्या आखातात ‘वेला नोव्हा’ जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; किनारपट्टीजवळ सुरक्षा यंत्रणा सतर्क

जर अंतिम तपासात नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले, तर संबंधित वैमानिकावर कठोर नियामक कारवाई होऊ शकते. त्याच्या वैमानिक परवान्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

AI2379 विमानातील टर्ब्युलन्स नेमके कशामुळे झाले आणि कॅप्टनच्या ड्रग टेस्टमध्ये आढळलेल्या पदार्थाचा या घटनेशी काही संबंध होता का, याचे उत्तर तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, कॅप्टनची ड्रग टेस्ट पॉझिटिव्ह आल्याच्या वृत्तामुळे विमान वाहतूक क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number