Central Railway News : मध्य रेल्वे स्थानकात थरार! लोकलवर चढलेल्या युवकाला OHE चा शॉक; डॉक्टरांनी केले मृत घोषित

मुंबई : घाटकोपर रेल्वे स्थानकावर गुरुवारी संध्याकाळी एका लोकलच्या छतावर चढण्याचा प्रयत्न करताना एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना संध्याकाळी 6.33 च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर घडली. या घटनेमुळे लोकल 19 मिनिटे थांबून राहिली. मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरच्या (विजेच्या तारेच्या) संपर्कात आला आणि त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने […]

Central Railway News : मध्य रेल्वे स्थानकात थरार! लोकलवर चढलेल्या युवकाला OHE चा शॉक; डॉक्टरांनी केले मृत घोषित

मुंबई : घाटकोपर रेल्वे स्थानकावर गुरुवारी संध्याकाळी एका लोकलच्या छतावर चढण्याचा प्रयत्न करताना एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना संध्याकाळी 6.33 च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर घडली. या घटनेमुळे लोकल 19 मिनिटे थांबून राहिली. मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरच्या (विजेच्या तारेच्या) संपर्कात आला आणि त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. संबंधित लोकल गाडीचा प्रवास पुन्हा सुरू होण्यापूर्वी ती सुमारे 19 मिनिटे तिथेच थांबून राहिली. मिळालेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर थांबलेल्या लोकल ट्रेनच्या छतावर चढण्याचा प्रयत्न त्या अज्ञात तरुणाने केला. या प्रयत्नादरम्यान तो ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आला आणि त्याला विजेचा धक्का बसला. दरम्यान, त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा : Maharashtra Govt DA Hike: सणासुदीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना फडणवीस सरकारची मोठी भेट; महागाई भत्त्यात वाढ

घाटकोपर स्थानकात घडलेल्या या घटनेमुळे टिटवाळा लोकल ट्रेन काही काळ स्थानकातच खोळंबली. अपघातानंतर सुरक्षेच्या कारणास्तव विक्रोळी-कांजूरमार्ग दरम्यान डाऊन मार्गावरील OHE वीजपुरवठा नऊ मिनिटांसाठी बंद करण्यात आला. वीजपुरवठा खंडित झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आणि प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला आहे. लोकलची वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि तांत्रिक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शॉक लागलेल्या तरुणाला खाली काढत रुग्णालयात नेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी 6.52 वाजता टिटवाळा – 43 लोकल पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number