वाघांची ट्रेन

वाघांची  ट्रेन

अभयारण्यात गेल्यावर वाघाचे दर्शन होईलच, याची खात्री नसते . अनेक पर्यटकांना निराश होऊनही अभयारण्यातून आल्या पावली परतावे लागते.  दोनंदा – तीनदा अभयारण्यात सफारी केली तरी जंगलाच्या राजाचे दर्शन होत नाही. असे असताना एक, दोन, तीन नव्हे तर चक्क सहा वाघांनी पर्यटकांना दर्शन दिले. असा हा दुर्मिळ योगायोग उमरेड- पवनी करांडला अभयारण्यात बघायला मिळाला, सहा वाघ दिसण्याचा हा ‘योग’ व्हिडिओमध्ये कैद करण्यात आला आहे.

असा हा दुर्मिळ योगायोग उमरेड – पवनी – कऱ्हांडला अभयारण्यात शनिवारी जुळून आला. सहा वाघ दिसण्याचा हा ‘याेग’ व्हिडिओमध्ये कैद करण्यात आला असून ताे व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे आता पवनी गेटवर पर्यटकांची मोठी गर्दी वाढत आहे.

अलीकडे उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य वाघ्र दर्शनासाठी प्रसिद्धीस येत आहे. भंडारा जिल्ह्यात समृद्ध वनसंपदा असून, नवेगाव – नागझिरा, कोका आणि उमरेड – पवनी – कऱ्हांडला अशी तीन अभयारण्य आहेत. जैवविविधतेसाठी प्रसिद्ध या अभयारण्यांत मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा संचार आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी गेटमधून प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना हमखास वाघांचे दर्शन होते. त्यामुळे येथे पर्यटकांची कायम गर्दी असते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून एकाच वेळी सहा वाघांचे दर्शन होत आहे. शनिवारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना प्रसिद्ध शॅडो वाघिणीसह तिचे तीन बछडे आणि अन्य दोन वाघांचे दर्शन झाले. त्यांनी वाघांचा मुक्त संचार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. अभयारण्य पावसाळ्यात बंद होत असल्याने त्यापूर्वी पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येऊ लागले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version