Pakistan Bullet Train: कर्जात बुडालेल्या पाकिस्तानचा आत्मविश्वास तरी पाहा! देशात सुरु करणार बुलेट ट्रेन

ढासळलेली रेल्वे व्यवस्था आणि चीनच्या CPEC प्रकल्पावर अवलंबून असूनही 2030 पर्यंत हायस्पीड ट्रेन धावण्याचे अवास्तव स्वप्न जगामध्ये चर्चा आणि टीकेचा विषय ठरले आहे.
Pakistan Bullet Train: कर्जात बुडालेल्या पाकिस्तानचा आत्मविश्वास तरी पाहा! देशात सुरु करणार बुलेट ट्रेन

पाकिस्तान हा सध्या जगामध्ये सर्वात वाईट दृष्ट्या आर्थिक संकटात बुडालेला देश आहे. जागतिक बँकेच्या विळख्यात गळ्याला फास लावून अडकला आहे पाकिस्तान. त्यांचं सरकार कर्जावर सुरुये आणि लोकांच्या दैनंदिन गरजांसाठीही पैशांची कमतरता आहे. पण या सगळ्यातही पाकिस्तानला काळजी कसली? पगार, रोजगार, रेशन, औषधे याची नाही. त्याऐवजी त्यांना काळजी आहे कराची ते लाहोर बुलेट ट्रेन! होय, अगदी तीच पाकिस्तानची रेल्वेसेवा जी चुकून कधी वेळेत धावली तर पाकिस्तानी लोक अक्षरशः आनंद साजरा करतात.

या रेल्वेनं आता दावा केला आहे की 2030 पर्यंत कराची ते लाहोर 20 तासांचा प्रवास फक्त पाच तासांत पूर्ण होईल. म्हणजे त्यांच्याकडे आहे त्या जुन्या रेल्वेचे इंजिन तापायला अर्धातास लागतो, पण स्वप्न मात्र जपानसारखं! आणि हे सगळं का? कारण भारत 2027 मध्ये पहिली बुलेट ट्रेन चालवणार आहे. मग पाकिस्तानचं हे करण्यामागे कारण काय? भारताशी स्पर्धा करायची आहे म्हणे! आर्थिक स्थिती शून्य, पण पोकळ महत्त्वाकांक्षा गगनाला भिडणारी! पाकिस्तानकडे आज स्वतःच्या रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती करण्याएवढे पैसे नाहीत. अनेक मार्ग अर्धवट उध्वस्त अवस्थेत आहेत.

हेही वाचा: Shaharukh Khan On Terror Attack : दहशतवादी हल्ल्यांवर शाहरूख खानने केलं भाष्य, म्हणाला, 'भारताला कोणतीही गोष्ट हादरवू शकत नाही'

मालवाहतूकीची रेल्वेसेवा तर एवढी कमजोर आहे की मालवाहतूक दर केवळ 4 टक्के! पण तरीही तिथले नेते म्हणतात “बुलेट ट्रेन आली की पाकिस्तान सुधारेल!” आता सांगा कर्जाच्या खड्ड्यामध्ये जावून काशी होईल या देशाची सुधारणा. यासाठी पाकिस्ताननं CPECअंतर्गत 6.8 अब्ज डॉलरचा ML-1 प्रकल्प चीनपुढे ठेवला आहे. 1,215 किमीची हायस्पीड लाईन, 250 किमी प्रतितास वेग… अशी सगळी स्वप्नाळू गणितं काढली आहेत. चीन तंत्रज्ञान देणार, पैसा देणार आणि नंतर काय करणार हे जगाला ठाऊक आहे. ज्यांना श्रीलंकेचं ‘हंबनटोटा पोर्ट’ आठवतं, त्यांना पाकिस्तानचं भविष्य आधीच कळालंय.

रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी तर हा प्रकल्प “पाकिस्तानची सर्वात दूरदर्शी योजना” म्हणत आहेत. पण चीनसोबतचे त्यांच्या मागील रेल्वे प्रकल्पांचे रेकॉर्ड इतके वाईट आहेत की पाकिस्तानच्या स्टेशन्सवर “आम्ही परत फसलो” अशी पाटीच लावावी लागेल. एकूणच पाहिलं तर जिथे स्वतःच्या रेल्वेगाडीची चेन खेचायला लोक प्लॅटफॉर्मवर उभे नाहीत अशा या देशात बुलेट ट्रेन मात्र 250 किमी वेगाने धावणार आहे बरं!

हेही वाचा: Pankaja Munde's PA Anant Garje Wife Death : "घरात पोहचल्यावर मी पाहिलं गौरी…" पत्नीच्या मृत्यूनंतर अनंत गर्जेंची पहिली प्रतिक्रिया

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version