Trump On Shipping Toll: ‘होर्मुझमध्ये जहाजांना टोल लागणार नाही, वचन मोडल्यास…’; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, या अत्यंत महत्त्वाच्या सागरी मार्गावरून जाणाऱ्या कोणत्याही जहाजावर कोणताही टोल, विमा शुल्क किंवा इतर कुठलाही कर लादला जाणार नाही.
Trump On Shipping Toll: ‘होर्मुझमध्ये जहाजांना टोल लागणार नाही, वचन मोडल्यास…’; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

Trump On Shipping Toll: होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय जहाजांवर टोल किंवा अतिरिक्त कर आकारला जाण्याच्या भीतीने जगभरात चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, यावर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक घोषणा केली आहे. मंगळवारी ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, या अत्यंत महत्त्वाच्या सागरी मार्गावरून जाणाऱ्या कोणत्याही जहाजावर कोणताही टोल, विमा शुल्क किंवा इतर कुठलाही कर लादला जाणार नाही, असे लेखी आश्वासन इराणने अमेरिकेला दिले आहे.

‘ट्रुथ सोशल’वरून ट्रम्प यांचा तेहरानला कडक इशारा
इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटींची माहिती देताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ट्रम्प यांनी लिहिले की, “होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर करणाऱ्या मालवाहू जहाजांकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क किंवा कर घेतला जाणार नाही, यावर इराण ठाम आहे.” याच वेळी त्यांनी इराणला सज्जड दम भरताना म्हटले की, “जर इराणने या नियमांचे उल्लंघन केले किंवा दिलेला शब्द मोडला, तर त्यांच्याशी सुरू असलेली सर्व चर्चा अमेरिका तातडीने थांबवेल.”

इराणला रोख रक्कम देण्याच्या चर्चा ट्रम्प यांनी फेटाळल्या
या वाटाघाटींचा एक भाग म्हणून अमेरिका इराणला मोठी आर्थिक मदत पुरवत असल्याच्या आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमधील बातम्यांचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पूर्णपणे खंडन केले आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “अमेरिका इराणला कोणत्याही प्रकारची थेट रोख रक्कम देत नाहीये, तसेच त्यांची कोणतीही जप्त केलेली संपत्ती विनाअट परत केलेली नाही.”

हेही वाचा – Ebola Case : फ्रान्समध्ये इबोलाचा पहिला रुग्ण, डीआरसी काँगोतून परतलेल्या एका डॉक्टराला लागण; आरोग यंत्रणा सतर्क

इराणला अन्नधान्याची गरज; मुक्त केलेल्या निधीतून केवळ अमेरिकन मालाचीच खरेदी होणार
या संपूर्ण कराराचे स्वरूप स्पष्ट करताना ट्रम्प म्हणाले की, वॉशिंग्टन सध्या अमेरिकेच्या ताब्यात असलेला इराणचा काही निधी निश्चितपणे मुक्त करणार आहे. मात्र या पैशांचा वापर इराणला केवळ मका, गहू आणि सोयाबीन यांसारखी अमेरिकन कृषी उत्पादने आयात करण्यासाठीच करता येईल. सध्या इराणमध्ये या अन्नधान्याचा मोठा तुटवडा असून, या करारांतर्गत त्यांना संपूर्ण अन्नधान्याचा पुरवठा थेट अमेरिकेकडूनच केला जाणार आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version