मुंबई एनसीबीने नांदेडमध्ये मोठी कारवाई केली आहे. विशाखापट्टणम येथून गांजा घेऊन जाणार ट्रक एनसीबीने पकडला आहे. नायगाव तालुक्यातील मांजरम येथे सकाळी ४.०० वा. सुमारास पोलिसांनी हा ट्रक पकडला.
एनसीबीने कारवाई दरम्यान ट्रक पकडला. या ट्रकमध्ये ४९ पोते गांजा जप्त करण्यात आला आहे. एनसीबीने ट्रक ड्रायव्हरसह अन्य एकाका एनसीबीने ताब्यात घेतले आहे. एनसीबीने जप्त केलेल्या गांज्याची किंमत ४ कोटी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात एनसीबी पोलीस कडून कसून चौकशी सुरु आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.