अमेरिकेने H-1B व्हिसा फी वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे अमेरिकेत काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो लोकांना एच-1बी व्हिसा मिळालेला नाही त्याचप्रमाणे अनेकांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. बेंगळुरूच्या एका तंत्रज्ञान तज्ञासोबतही असेच घडले आणि त्याचा एच-१बी व्हिसा तीन वर्षांपासून नाकारला जात होता, परंतु त्याच्या कठोर परिश्रमाने त्याला अमेरिकेत येण्याचा मार्ग सापडला.
कॅलिफोर्नियामध्ये काम करणाऱ्या तनुश शरणार्थीने व्हिसा मिळवण्यासाठी तीन वेळा अर्ज केला मात्र तो तीन वेळा नाकारण्यात आला. मात्र नंतर त्याने 0-1 व्हिसा मिळवला. तनुशने स्पष्ट केले की त्याला आर्टिफिशियल इंटेलिजेंसमधील काम आणि संशोधनामुळे 0-1 व्हिसा मिळाला.
त्याने याबद्दलची माहिती लिंक्डइन पोस्टवरून दिली. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "तीन वर्षे H-1B व्हिसा अपयशी ठरल्यापासून ते आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या क्षेत्रात O-1 'आइन्स्टाईन' व्हिसासाठी अखेर मंजुरी मिळण्यापर्यंत, मी सलग तीन वर्षे H-1B साठी मला वाट बघायला लागली".
पुढे त्याने लिहिले की, "पण नशिबावर अवलंबून राहण्याऐवजी, मी फक्त मी करू शकणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले: रात्री उशिरापर्यंत काम करणे, उत्पादने तयार करणे, संशोधन पत्रे प्रकाशित करणे आणि मला आवडणाऱ्या क्षेत्रात योगदान देणे ठरले. या आठवड्यात मला O-1 व्हिसासाठी मंजुरी मिळाली, जो त्यांच्या क्षेत्रातील उच्चपदस्थ लोकांसाठी राखीव आहे".
विशिष्ट क्षेत्रात म्हणजे कला, विज्ञान, शिक्षण, व्यवसाय किंवा क्रीडा अशा असाधारण क्षमता असलेल्या व्यक्तींना O-1 व्हिसा दिला जातो. यासाठी तुमचे काम राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाणे आवश्यक आहे. तसेच एच-1बी व्हिसा हा उच्च शिक्षण आवश्यक असलेल्या विशेष व्यवसायांसाठी आहे. हे सामान्यतः तांत्रिक, अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा इतर व्यावसायिक नोकऱ्यांना लागू होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.