राज्यात गेल्या काही दिवसांपासून पेपरफुटी प्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणी अनेक आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, आज पुणे पोलिसांनी टीईटी पेपरफुटी प्रकरणी ३,९५५ पानांचे दोषारोपपत्र पुणे जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले आहे.
टीईटी पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी १५ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात तुकाराम सुपे, सुशील खोडवेकर, प्रितेश देशमुख, सुखदेव ढेरे यांचा समावेश आहे. तसेच या प्रकरणी अद्याप १२ आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध पुणे पोलिस घेत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.