रशियाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश झुगारला

रशियाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश झुगारला

रशिया-युक्रेन युद्धाचा आज २३वा दिवस आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रशिया-युक्रेन देशांमध्ये टोकाचे युद्ध सुरू आहे. तर हे सुद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. रशियाने युक्रेनच्या अनेक नागरी वस्तींवर हल्ले केले असून अनेक शहरे उद्ध्वस्त केली आहेत. तर रशियाने हे युद्ध थांबवण्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आदेश दिले होते. मात्र, रशियाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश झुगारून २३व्या दिवशीही युद्ध सुरूच ठेवले.

रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरूच आहे. तर हे युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा करण्यात आली. मात्र, अद्याप या चर्चेला यश आलेले नाही. तर रशियाची युक्रेनवर आक्रमक भूमिका कायम आहे. युद्धाच्या २३व्या दिवशी रशियाने युक्रेनच्या शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. रशियाच्या लष्करी सैन्यांनी खारकीवजवळ हवाई हल्ला केला आहे. तसेच या हल्ल्यात २१ जणांचा मृत्यू झाली असल्याची माहिती युक्रेनने दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version