संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा बँक निवडणूकीचे अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार शशिकांत शिंदे आणि गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव झाला आहे. तर सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर आणि ज्ञानदेव रांजणे विजयी झाले आहेत.
अत्यंत चुरशीच्या सातारा जिल्हा बँक निवडणूकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या बँक निवडणूकीत सत्यजित पाटणकर यांना ५८ मते मिळाली असून १४ मतांनी ते विजयी झाले आहेत. तर शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव करत ज्ञानदेव रांजणे २५ मतांनी विजयी झाले आहेत. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी माजी मंत्री विलासराव उंडाळकर यांच्या मुलाचा पराभव करत विजय मिळवला आहे. खासदार उदयनराजे यांच्यासह उर्वरित जागा यापूर्वी बिनविरोध निवडून आल्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.