‘जमल्यास शरद पवारांकडून काही शिका’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘जमल्यास शरद पवारांकडून काही शिका’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत बोलताना काँग्रेसवर निशाणा साधला आहे. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची स्तुती केली. काँग्रेसच्या निराशेचा परिणाम इतरांवर होत आहे, त्यामुळे जमल्यास शरद पवारांकडून काही शिका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, प्रत्येक नेता आपल्या क्षेत्रात मोठा असतो. मात्र, नेतृत्वामध्ये निराशा असेल तर देशाचे काय होईल? विरोधात असताना देशाच्या हिताचा विचार करता येत नाही का? त्यामुळे कोणाकडून जर शिकायचे असेल तर शरद पवार यांच्याकडून शिका. शरद पवार आजारपणातही लोकांना शिकवण देतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच कोरोना काळात घेतलेल्या बैठकींवर काँग्रेसने बहिष्कार टाकला परंतु शरद पवारांनी साथ दिली, असेही पंतप्रधान म्हणाले.

तसेच पंतप्रधान म्हणाले, २०१३मध्ये देशाची दुर्दशा झाली होती. तसेच २०१४मध्ये सत्ता गेल्यामुळे विरोधकांच्या डोळ्यात काजवे चमकले, त्यामुळे काही लोकांची दृष्टी गेली आहे. त्यामुळे काँग्रेसला २०१३मधील निराशा दिसत आहे, असा टोलाही पंतप्रधानांनी लगावला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version