मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींवर माझा विश्वास नाही, असे विधान केले. त्यामुळे भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. आव्हाडांकडून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू असून आव्हाडांनी ओबीसी समाजाबाबत केलेल्या वक्तव्याबद्ल माफी मागावी अन्यथा ओबीसी समाज धडा शिकवेल, असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य निंदनीय असून समाजात तेढ निर्माण करणारे आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या मंत्र्याला पदावर कार्य करण्याचा अधिकार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घेतील का, असा सवालही बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.
जितेंद्र आव्हाडांनी ओबीसी समाजाबद्दल केलल्या वक्तव्यामुळे विरोधकांनी आव्हाडांवर टीका केली आहे. आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खुश करणारे कंत्राटी कामगार असल्याचा टोला भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.