आरोग्य विभागाच्या ‘गट ड’ची परीक्षा पुन्हा होण्याची शक्यता असल्याचे सूचक विधान राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. आरोग्य विभागाच्या ‘गट ड’च्या परीक्षेत मोठा घोळ झाल्याचे निर्दर्शनास आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याबाबत पोलिसांचा सध्या तपास सुरु आहे.
या तपासकार्यानंतर पोलिसांचा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिला जाईल आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. मात्र पोलिसांनी लवकरात लवकर हा अहवाल द्यावा, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.
आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणी यापूर्वीच बीड जिल्ह्यात कारवाई करण्यात आली आह. तसेच याप्रकरणी आता भारतीय जनता युवा मोर्चा पाटोदा माजी अध्यक्ष संजय सानप यांना पोलिसांनी अटक केली आहे.
संजय सानप यांची पुण्यात सायबर पोलिसांकडून चौकशी सुरू असताना पेपरफुटी प्रकरणी त्यांचा सहभाग असल्याचे आढळून आले. त्यावेळी पोलिसांनी संजय सानप यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी संजय सानप यांना २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.