एलोन मस्क AI च्या जगात आणणार नवी क्रांती; Grok 3 लाँचसाठी सज्ज! ChatGPT आणि Gemini साठी ठरू शकते मोठे आव्हान

एलोन मस्क यांनी ग्रोक 3 लवकरच लाँच होणार असल्याची घोषणा केली आहे. जगातील सर्वात स्मार्ट एआय म्हणून त्याचे वर्णन केले जात आहे. ग्रोक 3 काय आहे? त्याचा कसा वापर होईल? ग्रोक 3 चा काय परिणाम होईल?
एलोन मस्क AI च्या जगात आणणार नवी क्रांती; Grok 3 लाँचसाठी सज्ज! ChatGPT आणि Gemini साठी ठरू शकते मोठे आव्हान
Edited Image

Grok 3: आजच्या तंत्रज्ञान जगात AI चे वर्चस्व मिळवलं आहे. यात एलोन मस्कची कंपनी xAI देखील या शर्यतीत मागे नाही. अलीकडेच एलोन मस्क यांनी ग्रोक 3 लवकरच लाँच होणार असल्याची घोषणा केली आहे. जगातील सर्वात स्मार्ट एआय म्हणून त्याचे वर्णन केले जात आहे. ग्रोक 3 काय आहे? त्याचा कसा वापर होईल? ग्रोक 3 चा काय परिणाम होईल? यासंदर्भात जाणून घेऊयात.  

ग्रोक 3 ची वैशिष्ट्ये आणि क्षमता – 

ग्रोक एआय विशेषतः एक्स (पूर्वी ट्विटर) प्लॅटफॉर्मसाठी डिझाइन केलेले आहे आणि त्याची खासियत म्हणजे ते रिअल-टाइम डेटावर प्रक्रिया करू शकते. नवीन ग्रोक 3 मध्ये अधिक शक्तिशाली वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. नैसर्गिक भाषा समजण्याची त्याची क्षमता पूर्वीपेक्षा चांगली असेल, ज्यामुळे तो मानवासारख्या भाषेत प्रतिसाद देऊ शकेल. ते रिअल-टाइममध्ये इंटरनेट अॅक्सेस करू शकते, याचा अर्थ तुम्हाला एखाद्या गोष्टीची अपडेटेड माहिती मिळणे शक्य होईल. ग्रोक 3 हे सखोल तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमतेसह जटिल प्रश्नांची चांगली उत्तरे प्रदान करण्यास सक्षम असेल.

हेही वाचा – Tech Tips : हॉटेलच्या रूममध्ये कॅमेरा लपवलेला असेल का? स्मार्टफोनच्या मदतीने असं ओळखा..

ग्रोक 3 चा बाजारावरील परिणाम – 

ग्रोक 3 हे एक्स प्लॅटफॉर्ममध्ये एकत्रित केले आहे, ज्यामुळे ते इतर एआय चॅटबॉट्सपेक्षा अधिक खास बनते. यामुळे X वरील वापरकर्त्यांना इतर चॅटबॉट्सपेक्षा अधिक प्रगत अनुभव मिळेल. तथापि, तज्ञांच्या मते ग्रोक 3 हे ChatGPT आणि Gemini साठी एक मोठे आव्हान ठरू शकते.

हेही वाचा –  चंद्रावर मोठा स्फोट होणार? 2024 YR4 लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर त्याचा एक तुकडा चंद्रावरही आदळणार

ग्रोक 3 AI जगात करणार नवा विक्रम –  

ग्रोक एआय सतत अपडेट होत आहे आणि येत्या काळात एआयच्या जगात नवीन विक्रम प्रस्थापित करू शकते. मस्क यांचे ग्रोक 3 हे तंत्रज्ञान जगातील एक महत्त्वपूर्ण एआय असल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु, ग्रोक 3 तज्ञांच्या अपेक्षांना कितपत पूर्ण करले, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version