अमरावतीत दलितांना पाणी मिळणार

अमरावतीत दलितांना पाणी मिळणार

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्नापूर येथील दलित वस्तीत मागील २८ दिवसांपासून ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा बंद केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. तसेच जाणीवपूर्वक पाणी पुरवठा बंद केल्यामुळे शेकडो ग्रामस्थांनी दोन फेब्रुवारीपासून रात्री गाव सोडून गावाच्या वेशीवर आंदोलन सुरू केले होते.

या बातमीचा जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने पाठपुरावा केला असून आता अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्नापूर येथील दलितांना पाणी मिळणार आहे.

२८ दिवस पाणी पुरवठा बंद केल्यामुळे येथील दलितांनी गावाच्या वेशीवर आंदोलन केले. शुक्रवारी प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर अखेर तिसऱ्या दिवशी हे आंदोलन मागे घेण्यात आले. आता या गावात तात्पुरत्या स्वरूपात पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. लवकरच कायमस्वरूपी सर्वांच्या घरी नळाला पाणी येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version