‘विक्रांत निधी घोटाळ्याचा आकडा कुठून आला?’ – किरीट सोमय्या

‘विक्रांत निधी घोटाळ्याचा आकडा कुठून आला?’ – किरीट सोमय्या

सक्तवसुली संचालनालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यानंतर संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केला आहे. विक्रांत युद्धनौकेच्या नावार ५८ कोटी रुपयांची रक्कम लाटली असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विक्रांत निधी घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांनी केलेले आरोप फेटाळत, सोमय्यांनी विक्रांत निधी घोटाळ्याचा आकडा कुठून आला?, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. तसेच याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरा सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यावर बोलताना, गुन्हा दाखल केल्याचे उत्तर न्यायालयात द्या, असे प्रतिआव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे.

विक्रांत युद्धनौका घोटाळ्याप्रकरणी सोमय्यांवर गुन्हा दाखल

किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत जमा झालेले कोट्यवधी रुपये राज्यपालांना देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, ते पैसे राज्यपालांना न देता स्वत:च लाटले असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहेत संजय राऊतांचे आरोप?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत ५७ ते ५८ कोटी रुपयांची रक्कम झाली होती. पण ही रक्कम राज्यपाल कार्यालयात पोहचले नसल्याचे समोर आले आहे. सोमय्यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लाटलेली रक्कम २०१४च्या निवडणूकीसाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला आहे. हा घोटाळा म्हणजे किरीट सोमय्यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी केलेली प्रतरणा आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version