विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले

विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताने पराभव पत्कारल्यानंतर विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आहे. शनिवारी विराट कोहलीने ट्विट करत  क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या जबाबदारीला रामराम केले असल्याची माहिती दिली आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने ६८ पैकी ४० सामने जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला आहे. विराट कोहली हा भारताचा यशस्वी कसोटी कर्णधार आहे. मात्र विराटने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यामुळे विराटप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे.

विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले असल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘बीसीसीआयने मला कर्णधारपदाची संधी दिल्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. मी सात वर्षे कर्णधारपद सांभांळले. अत्यंत मेहनतीने आणि प्रामाणिकपणे काम केले. मला माझ्या सहकाऱ्यांचा कायमच पाठिंबा होता. त्यामुळे मी बीसीसीआयसह सर्वांचे धन्यवाद मानतो.’ असे विराट म्हणाला.

विराटची कारकिर्द

क्रिकेट करिअरची सुरुवातीपूर्वी विविध शहराच्या क्रिकेट संघांचे प्रतिनिधित्व.

२००२ साली अंडर – १५ साठी निवड.

वयाच्या १९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये निवड.

२०११ विश्वचषक स्पर्धेत पहिल्या सामन्यात शतक ठोकणाऱ्या खेळाडूचा मान.

२०२१ पर्यंत कसोटीमध्ये ९६ मॅच खेळत ७७६५ रन.

कसोटी सामन्यांत २७ शतक आणि २७ अर्धशतक.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version