Trisha Krishnan Viral Video: आधी मंदिरात प्रार्थना, त्यानंतर थेट विजयला भेटायला पोहोचली तृषा; व्हायरल व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण

थलपती विजय यांच्या निवडणूक विजयानंतर अभिनेत्री तृषा कृष्णन यांनी त्यांच्या घरी भेट दिल्याची चर्चा रंगली आहे.
Trisha Krishnan Viral Video: आधी मंदिरात प्रार्थना, त्यानंतर थेट विजयला भेटायला पोहोचली तृषा; व्हायरल व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण

तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजयसाठी आजचा दिवस विशेष ठरला आहे. एकीकडे निवडणुकीत मिळालेला मोठा विजय, तर दुसरीकडे त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित घडामोडींमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. निवडणुकीत यश मिळाल्यानंतर विजयच्या घरी अभिनेत्री तृषा कृष्णनने भेट दिल्याची चर्चा रंगली आहे. यासंदर्भातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले असून, चाहत्यांमध्ये या भेटीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून विजय आणि त्रिशा यांच्या नात्याबद्दल विविध चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः विजयच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींनंतर या चर्चांना अधिक जोर मिळाला. दोघेही काही कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या मैत्रीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले. तृषाच्या वाढदिवसानिमित्त ती तिरुपती मंदिर येथे दर्शनासाठी गेल्याची माहिती समोर आली. याच पार्श्वभूमीवर त्यांनी विजयच्या यशासाठी प्रार्थना केल्याचीही चर्चा रंगली.

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तृषा थेट विजयच्या निवासस्थानी पोहोचल्याचे सांगितले जात आहे. काही व्हिडिओंमध्ये त्या कारमधून विजयच्या घराजवळ दिसत आहेत. या वेळी त्यांच्या भोवती चाहत्यांची मोठी गर्दी जमल्याचेही पाहायला मिळाले. या भेटीमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण याला केवळ मैत्रीपूर्ण भेट मानत आहेत, तर काहींनी या भेटीतून नात्याबाबत नव्या चर्चांना सुरुवात केली आहे. अलीकडेच विजय आणि तृषा यांच्या लग्नाबाबत काही अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. एका व्हिडिओमुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली. विशेष म्हणजे त्या पोस्टला तृषा यांच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांमुळेही चाहत्यांमध्ये कुतूहल वाढले.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version