क्रिकेटच्या विश्वात महिलांचे प्रदर्शन जरी मैदानावर गाजत असले तरी, आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या गोष्टीही चर्चेत येत आहेत. सध्या समलैंगिक विवाहा बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. या प्रवाहात आता दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूचं नाव देखील जोडल गेल आहे. दक्षिण आफ्रिकेची ऑलराऊंडर क्लो ट्रायोनने तिची मैत्रिण मिशेल नेटिवलशी लग्न उरकलं आहे.
क्लो ट्रायॉनने शनिवारी, 29 नोव्हेंबर 2025 रोजी मिशेल नटवेलशी लग्न केले. नटवेल आणि ट्रायॉन काही काळापासून एकमेकींना डेट करत आहेत. 2025 च्या महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताकडून पराभूत झाला.
विश्वचषकानंतर ट्रायॉनने आता लग्न केले आहे. यासंबंधीत सोशल मीडियावर पोस्ट करत तिने "आपले संपूर्ण आयुष्य एकत्र." असे कॅप्शन देत तिच्या लग्नाची घोषणा केली आहे. यावेळी ट्रायॉनने गुडघ्यावर बसून मिशेल नेटिवलला प्रपोज जेल्याचे दिसून येत आहे.
क्लो ट्रायॉनची जोडीदार मिशेल नेटिव्हल एक कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका आहे. त्याचसोबत ती सोशल मीडियासाठी कंटेंट तयार करते. तिचे सोशल मीडियावर 50 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स सक्रिय आहेत.
या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाची ॲलेक्स ब्लॅकवेल आणि इंग्लंडची लिंडसे आस्क्यू यांनी 2015 मध्ये लग्न केले होते.
त्यानंतर 2017 मध्ये न्युझीलँडची एमी सॅटर्थवेट आणि ली ताहुहू या दोघींनी लग्न केले होते. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डॅन वॅन नीकर्क आणि स्टार ऑलराऊंडर मॅरिजॅन कप्प यांनीही 2018 मध्ये लग्न केले. ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज मेगन शुट्ट हिने 2019 मध्ये जेस होलिओक हिच्यासोबत लगीन गाठ बांधली. इंग्लंडची स्टार ऑलराऊंडर नताली सायवर आणि कॅथरीन ब्रंट यांनीही 2022 रोजी लग्न केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.