फोर्ब्स या प्रसिद्ध मासिकेमध्ये भारताची ३० अंडर ३० अशी यादी तयार करण्यात आली आहे. या यादीमध्ये भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील हिमा दास यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राही या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
फोर्ब्स इंडियाच्या ३० अंडर ३० या यादीमध्ये एंटरटेनमेंट अशा अनेक क्षेत्रांचाही समावेश करण्यात आला आहे. या यादीमध्ये पहिल्यांदाचउद्योग, उर्जा, मार्केटिंग, मीडिया, कृषी या क्षेत्रांचाही समावेश करण्यात आला आहे.
देशातील ३० वर्षांखाली युवकांचा फोर्ब्स या यादीत समावेश होतो.
या युवकांचा सन्मान केला जातो.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.