Shah Rukh Khan Controversy : "त्याला भारतात राहण्याचा अधिकार नाही", राजकारण्यांसह धर्मगुरूंचाही ‘किंग खान’वर टीकेचा भडीमार; नेमकं असं काय केलं?

इंडियन प्रीमियर लीग 26 मार्च 2026 ते 31 मे 2026 दरम्यान होणार असून याचे मिनी ऑक्शन डिसेंबर 2025 मध्ये पार पडले. यादरम्यान बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानवर जोरदार टीकांचा भडीमार होत आहे.
Shah Rukh Khan Controversy : "त्याला भारतात राहण्याचा अधिकार नाही", राजकारण्यांसह धर्मगुरूंचाही ‘किंग खान’वर टीकेचा भडीमार; नेमकं असं काय केलं?

इंडियन प्रीमियर लीग 26 मार्च 2026 ते 31 मे 2026 दरम्यान होणार असून याचे मिनी ऑक्शन डिसेंबर 2025 मध्ये पार पडले. यादरम्यान बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानवर जोरदार टीकांचा भडीमार होत आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील लिलावादरम्यान अभिनेता शाहरुख खानने त्याच्या कोलकाता नाइट रायडर्स या संघात मुस्तफिजूर रहमानल या बांगलादेशी वेगवान गोलंदाजाला सामील करण्यात आले. याचपार्श्वभूमिवर उत्तर प्रदेशचे भाजप नेते आणि सरधानाचे माजी आमदार संगीत सिंह सोम यांनी शाहरुख खानवर तीव्र टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदू तरुणांना लक्ष्य केले जात आहे. 18 डिसेंबर 2025 रोजी दीपू चंद्र दास या भारतीय तरुणाला जाळून संपवण्यात आलं. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त केला जात होता.

हेही वाचा- Shah Rukh Khan: बॉलीवूडनंतर क्रिकेटमध्येही किंग! KKR साठी शाहरुख खानचा मोठा प्लॅन

अशातच शाहरुख खानने त्याच्या केकेआर या संघात एका बांगलादेशी खेळाडूला सामील केल्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावेळी संगीत सिंह सोम यांनी शाहरुख खानला देशद्रोही आणि गद्दार म्हणत त्याला भारतात राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं म्हटलं आहे. यावेळी संगीत सिंह सोम म्हणाले की, “एकीकडे बांगलादेशात हिंदूंची हत्या होत आहे, तर दुसरीकडे आयपीएल लिलावात तिथल्याच क्रिकेटपटूंना खरेदी केलं जात आहे. शाहरुखने नऊ कोटी रुपये खर्च करून बांगलादेशी क्रिकेटर मुस्तफिजूर रहमानला खरेदी केलंय. बांगलादेशात भारताच्या विरोधात घोषणा दिल्या जातात, पंतप्रधानांना शिवीगाळ केली जाते. परंतु शाहरुखसारखे देशद्रोही नऊ कोटी रुपये खर्च करून त्यांना मदत करत आहेत. त्याला या देशात राहण्याचा अधिकार नाही” इतकचं नव्हे तर संगीत सोम यांच्या टीकेच्या एका दिवसानंतर जगदगुरू स्वामी रामभद्राचार्य, बाबा बागेश्वर आणि देवकी नंदन यांसारख्या धर्मगुरूंनीही या वादात शाहरुख खानला निशाण्यावर धरलं आहे. यावर बीसीसीआयने आपली भूमिका मांडत म्हटल की, भारत सरकारकडून बांगलादेशी खेळाडूंवर बंदी घालण्चे कोणतेही नियम काढले नाही. जर तसे आदेश मिळाले तर याविषयी निर्णय घेता येईल. 

हेही वाचा- Bangladesh Violence: भयंकर! आधी घरांना बाहेरून कुलूप लावलं, मग आग पेटवली; बांगलादेशात हिंदू कुटुंबाची पाच घरं जाळली
16 डिसेंबर 2025 रोजी पार पडलेल्या आयपीएल लिलावात शाहरुख खानच्या केकेआर संघाने बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजूर रहमान याला 9 कोटींमध्ये आपल्या संघात सामील करून घेतले होते. त्यानंतर राजकारणी आणि धर्मगुरूंनी शाहरुख खानला चांगलचं निशाण्यावर ठेवल. केकेआर फ्रँचाइजीचे सहमालक शाहरुख खआनसह अभिनेत्री जुही चावला आणि तिचा पती जय मेहतासुद्धा आहे. या संघात शाहरुखची 55 टक्के आणि जुही चावला, जय मेहता यांची 45 टक्के भागीदारी आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version