काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पंजाबचा हिरा चमकला. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने हार्दिक पांड्याचा अप्रतिम झेल घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मार्को जान्सेनच्या 18व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हार्दिक पंड्याने लाँग-ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू झेलण्यासाठी श्रेयस अय्यरने वापरलेली चपळता चर्चेच्या केंद्रस्थानी आली. हार्दिकने मारलेला फटकार पाहता एकाही क्षणाचा विलंब न करता श्रेयस अय्यरने हवेतच अफलातून उडी मारत बॉल हातात घेतला, इतकचं नव्हे तर आपण सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि आपला पाट टेकण्यापूर्वीच त्याने तो बॉल सीमारेषेच्या आत असलेल्या झेवियर बार्टलेटकडे सोपवला. त्याने हवेत असतानाच रिव्हर्स कप पद्धतीने चेंडू पकडला आणि तोल जात असल्याचे लक्षात येताच सीमारेषेआधी झेवियर बार्टलेटच्या दिशेने चेंडू फेकला. श्रेयस अय्यरच्या या चपळतेकडे संपूर्ण स्टेडियम हक्काबक्का होत त्याच्याकडे एकटक पाहत पसला.
यानंतर श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जच्या सोशल मीडियावर त्याच्या या अफलातून कॅचवर एका शब्दात मनोगत स्पष्ट करण्याचे सांगितले. तुझ्या कॅचवर एका शब्दात काय उत्तर देशील? असं विचारल्यावर त्यावेळी त्याने एका शब्दात उत्तर देत म्हटलं की, Spectacular म्हजेच छाप पाडणारे, स्वतःची पाठ थोपटावत तो पुढे म्हणाला, पण कुणाला कदर नाही रे…, श्रेयस अय्यरच्या या प्रतिक्रियेनंतर त्याच्या या कॅचची दखल थेट क्रिकेटच्या देवाने घेतली. त्याच्या त्या कॅच मधील अनेक बारकावे स्पष्ट करत खुद्द सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे.
The whole cricketing world is patting your back for that catch, Sarpanch! ?❤️ pic.twitter.com/zcZ2QC4h3w — Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 17, 2026
श्रेयस अय्यरला बॉलचा वेग, स्वत:ची उंची आणि बाउंड्री रोप नक्की कुठं आहे, तसेच त्या रोपच्या तो किती जवळ आहे. सर्व अंदाज अचूक घेऊन त्यानंतर, हवेत असतानाच त्याने तो बॉल पकडला आणि इतकचं नव्हे तर जमिनीवर पाय टेकण्यापूर्वी तो आपल्या सहकाऱ्याकडे फेकला. श्रेयस अय्यरचा बॉन्ड्रीजवळचा तो कॅच केवळ त्याच्या चपळतेमुळे नव्हे, तर त्यामागे असलेल्या कमालीच्या सजगतेमुळे अत्यंत खास ठरला, असं स्पष्ट मत मांडत खुद्द क्रिकेटचा देव म्हणजेच सचिन तेंडुलकर याने श्रेयस अय्यरच्या त्या कॅचमागील मेहनतीचे कौतूक केले आहे.
सचिन तेंडुलकरची पोस्ट काय?
श्रेयस अय्यरचा झेल केवळ त्याच्या शारीरिक क्षमतेमुळेच नव्हे, तर त्यामागील जागरूकतेमुळेही खास ठरला. त्याला चेंडूचा वेग, उंची, सीमारेषेची दोरी कुठे आहे, तो दोरीवर पाय ठेवण्यापासून किती जवळ आहे, या सर्वांचा अचूक अंदाज घ्यावा लागला आणि आपली उडीही अगदी अचूक मारावी लागली. मग, हवेत असतानाच, त्याने चेंडू पकडला आणि खाली उतरण्यापूर्वी तो आपल्या सहकाऱ्याकडे सोपवला; आणि हे सर्व करत असताना, तो क्षेत्ररक्षक नेमका कुठे उभा आहे, हे त्याला अचूकपणे माहीत होते. हे सर्व काही क्षणांत साधण्यासाठी अविश्वसनीय जागरूकता, अचूक टायमिंग, फिटनेस आणि संयम लागतो. श्रेयस अय्यर सगळं अगदी अचूक होतं. मी प्रत्यक्ष पाहिलेल्या सर्वोत्तम झेलपैकी हा एक होता!
What made Shreyas Iyer’s catch so special was not just the athleticism, but the awareness behind it. He had to judge the speed of the ball, the height, where the boundary rope was, how close he was to stepping on it, and get his jump absolutely perfect. Then, while still in the… — Sachin Tendulkar (@sachin_rt) April 17, 2026
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.