रोहितला झुणका भाकरची भुरळ

रोहितला झुणका भाकरची भुरळ

सुपरहिट अ‍ॅक्शन सिनेमा म्हंटल की मनात पाहिलं नाव येत ते म्हणजे दिग्दर्शक रोहित शेट्टीच. त्याच्या चित्रपटात नेहमीच आपल्याला जोरदार अ‍ॅक्शन, आलीशान गाड्या आणि कॉमेडी यांचा परफेक्ट मेळ दिसून येतो. रोहित शेट्टीचे अनेक चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.विशेष म्हणजे आपल्या चित्रपटांमध्ये तो मराठी कलाकारांना आवर्जून संधी देत असतो. परंतु त्याचं मराठी कलाकरांप्रमाणे मराठी पदार्थांवरही तितकंच प्रेम आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टीने पहिल्यांदाच मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे. नुकताच त्याचा पहिला मराठी चित्रपट ‘स्कूल कॉलेज आणि लाईफ’ याचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या नंतर या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. यावेळी एका कार्यक्रमात रोहितने मुलाखत दिली यावेळी त्याने मराठमोळ्या जेवणाचं भरभरून कौतुक केलं.यावेळी”मला झुणका-भाकरी आणि ठेचा खूप आवडतो.” असं रोहित म्हणाला. त्यामुळे त्याचं हे उत्तर आता चाहत्यांना भावलं असून त्यांचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version