युक्रेनने माघार घेतल्यास चर्चेस तयार; रशियाची भूमिका

युक्रेनने माघार घेतल्यास चर्चेस तयार; रशियाची भूमिका
ready 

रशिया-युक्रेन युद्धाचा तीढा वाढत चालला आहे. दरम्यान, युक्रेनने रशियाला चर्चेचे आमंत्रण दिले आहे. मात्र, युक्रेनने माघार घेतल्यास चर्चेसाठी तयार असल्याचे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी स्पष्ट केले आहे.

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह म्हणाले की, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे खोटं बोलत असून त्यांनी रशियासमोर कोणताही चर्चेचा प्रस्ताव ठेवला नाही. सध्याच्या युक्रेन सरकारला रशियाकडून लोकशाही सरकारचा दर्जा मिळण्याची कोणतीही शक्यता नाही.

रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला केला असून नाटो देशांनी आमची साथ सोडल्याचा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे. तसेच या युद्धात युक्रेनला एकट पाडल्याचेही झेलेन्स्की यांनी सांगितले आहे. भीतीपोटी युक्रेनला नाटोत सहभागी केले नसल्याचा आरोपही झेलेन्स्स्की यांनी केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version