RCB Won IPL 2026 : किंग कोहलीची शानदार फलंदाजी; GT ला नमवत RCB सलग दुसऱ्यांदा बनली IPL च्या विजयाची मानकरी

RCB Won IPL 2026 : किंग कोहलीची शानदार फलंदाजी;  GT ला नमवत RCB सलग दुसऱ्यांदा बनली IPL च्या विजयाची मानकरी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पुन्हा एकाद मैदान मारले आहे. आरसीबीने गुजरात टायटन्सला त्यांच्याचं मैदानावर नमवत आयपीएलच २०२६ च्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. आज, ३१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आरसीबी आणि जीटी यांच्या आयपीएल २०२६ चा अंतिम सामना रंगला. यावेळी आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्यण त्यांच्यासाठी योग्यच ठरल्याचे त्याच्या गोलंदाजांनी सिद्ध केले. जीटीच्या फलंदाजांना एकएक करून आरसीबीने परत पाठवले. जीटीने २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून १५५ धावा केल्या. त्यामुळे आरसीबीला अवघ्या १५६ धावांचे लक्ष्य दिले. जे त्यांनी सहज पूर्ण केले. आजच्या अंतिम सामन्यातही किंग विराट कोहलीने कमालीची बॅटिंग करत विजयश्री खेचून आणला. विराट कोहनी नॉट आऊट धावा करत आरसीबीचा विजय सोपा केला. अवघे ५ गडी गमावून आरसीबीने १५६ चे टार्गेट पूर्ण केले.

अंतिम सामन्याच्या विजयाचा शिल्पकार आयपीएलच्या पहिल्या सिजनपासूनचा खेळाडू विराट कोहली ठरला. विराटने ४२ चेंडूंमध्ये नाबाद ७५ धावा केल्या. तर अय्यरनेही सलामीवीर म्हणून ३२ धावांची दगडी साथ विराटला दिली. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांनी उत्तम खेळी दाखवत १५५ धावांवर गुजरातला रोखले. त्यामुळे आरसीबीला केवळ १५६ धावा बनवण्याचे लक्ष्य असल्यामुळे त्यांच्या प्रेशर कमी असल्याचे दिसून आले. त्यातही रसिक सलामने ३ विकेट्स घेतल्या असून भुवनेश्वर कुमार आणि हॅझलवूड यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर क्रुणाल पांड्याने एक विकेट घेतली. जीटीच्या फलंदाजांची घसगुंडी सुरू झाल्यामुळे त्यांच्या धावांचा रथ कोरला गेला. परिणामी, आरसीबी १८ ओव्हर्समध्ये १६१ धावा करत आयपीएलच्या चषकावर नाव कोरले. आरसीबीने सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल सिजन जिंकले असून त्यांच्या खेळाडूंनी पुढील वर्षीही आयपीएल जिंकून हॅटट्रिक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version