भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने मविआ सरकारचा निषेध

भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने मविआ सरकारचा निषेध

नागपुरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक हा काळा कायदा असे निदर्शने करत आंदोलनकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा पुतळा जाळला.

विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाच्या विरोधात नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने आंदोलन केले. मविआ सरकारच्या विरोधात भारतीय युवा मोर्चाच्यावतीने महाराजबाग येथिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गेटसमोर आंदोलन करण्यात आले. विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक हा काळा कायदा असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. विद्यापीठाच्या करोडोंच्या जागेवर डोळा ठेवून विद्यापीठात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र आघाडी सरकारचा जाहीर निषेध या वेळी करण्यात आला, तसेच सरकारचा पुतळादेखील जाळण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version