प्रेमीयुगुलाला मारहाण करणाऱ्या ‘त्या’ चार तरुणांना अटक

प्रेमीयुगुलाला मारहाण करणाऱ्या ‘त्या’ चार तरुणांना अटक

जालना तालुक्यातील गोंदेगाव येथील तळ्याजवळ एका प्रेमीयुगुलाला स्थानिक चार तरुणांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मारहाणीबरोबरच मुलीचा विनयभंग केल्याचंही व्हिडिओत दिसत होतं. ही घटना 29 जानेवारीची आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री आणि  गृहराज्यमंत्र्यांनी दखल घेतल्यावर पोलीस यंत्रणेने तात्काळ कारवाईला सुरुवात केली आहे. जालन्यातील तालुका जालना पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. कृष्णा वाघ, कारभारी वाघ, सुशील वाघ, आतिष खंदारे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

जालना प्रकरणाची माहिती मिळताच त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. असा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचीही प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

जालनामध्ये दुर्दैवी घटना घडली त्याचा मी निषेध करते तसेच महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे आणि यावर कारवाई करावी असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version