नाशकात अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरू असतानाच विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले गेले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि कवी डॉ. गौहर रझा यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. उद्घाटनाच्या भाषणातच रझा यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. तसेच ‘विद्रोही साहित्यिकांनी वेळीच आपली जबाबदारी ओळखावी,’ असे आवाहन त्यांनी केले.
‘विद्रोही साहित्याची मशाल महाराष्ट्रातील सर्व शहरात, राज्यात जावी. महाराष्ट्रबाहेर जात देशभरात विद्रोही साहित्याचा जागर होण्याची गरज आहे, असे रझा यांनी सांगितले. आताच्या विद्रोही साहित्यिकांनी नव्या भारताचे स्वप्न पाहायला हवे. त्यासाठी आपली जबाबदारी वेळीच ओळखावी’, असे ते म्हणाले.
साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिक,कवी, लेखक यांच्यासह वाचक आणि दर्शकांनाही एक पर्वणीच असते. नाशिक येथील विद्रोही साहित्य संमेलनामध्येही वाचकांसाठी अनेक स्टॉलवर वेगवेगळी पुस्तके उपलब्ध झाली आहेत.
शेतकरी आंदोलनातील ज्येष्ठ पंजाबी लेखक सुकदेवसिंग सिरसा यांचा सत्कार विद्रोही मंचाच्यावतीने करण्यात आले. सुकदेवसिंग सिरसा दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्वही केले आहे. त्यांची सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि त्यांनी संपादित केलेली तेरा पुस्तके अनुवादित झाली आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.