भारतीय लष्कराच्या कारवाईत मेहराजउद्दीन हलवाई ठार

भारतीय लष्कराच्या कारवाईत मेहराजउद्दीन हलवाई ठार

उत्तर काश्मीरच्या हंदवाडा येथे चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या अतिरेकी संघटनेचा सर्वोच्च कमांडर असलेला मेहराजउद्दीन हलवाई उर्फ ​​उबैद याला ठार करण्यात सुरक्षा दलाला मोठं यश आलं आहे. मेहराजउद्दीन अनेक दहशतवादी घटनांमध्ये सामील असल्याची माहिती काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

हांदवाडामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू झाली. काश्मीर खोऱ्यातील अनेक दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असलेला हिजबुल दहशतवादी मेहराजुद्दीनला जवानांनी ठार केलं आहे.

पोलीस, सैन्य आणि सीआरपीएफ यांच्याकडून त्या भागात सर्च अद्यापही ऑपरेशन सुरू आहे. सामान्य नागरिकांना धोका पोहोचू नये म्हणून हा परिसर रिकामा करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version