सामंथाची पोस्ट पाहून नेटकरी चिंतेत

सामंथाची पोस्ट पाहून नेटकरी चिंतेत

मुंबई, १० जुलै प्रतिनिधी : दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथाचे केवळ दक्षिण भागातच नाही तर संपूर्ण जगभरात अनेक चाहते आहेत. तिच्या चित्रपटांना जगभरातून प्रेक्षकांचा नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो. परंतू अलीकडेच तिने अभिनय क्षेत्रातुन ब्रेक घेणार असल्याचे सांगीतलं. दरम्यान सामंथाची आणखी एक पोस्ट पाहून तिचे चाहते चिंतेत पडले आहेत.

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो सामायिक केला होता. यात तिने लिहिले की, तिला गेल्या काही महिन्यांपासून खूप कठीण काळातुन जावं लागतंय. प्रदीर्घ आणि सर्वात वेदनादायी सहा महिने ! हे पाहून चाहते चिंतेत पडले आहेत.

त्यानंतर सामंथाने एक सकारात्मक पोस्ट सुद्धा लिहीली आहे. तिच्यावर खूप कठीण वेळ आली असली तरी आता तिने त्या कठीण काळाचा शेवट केला आहे.
पुढे तिने लिहिले, “प्रदीर्घ आणि सर्वात कठीण सहा महिने गेले आहेत… पण आता या वेदनादायी काळाचा शेवट होतोय.” त्यामुळे आता तिच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version