नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र

नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र

नवी दिल्ली, २६ ऑगस्ट, २०२३, प्रतिनिधी : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीत मजल मारली आहे. या कामगिरीमुळे तो पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.

पॅरिस येथे २०२४ मध्ये ऑलिम्पिक होणार आहे. या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याकरिता ८५.५० मीटरचे अंतर पार करणे आवश्यक होते. ही पात्रता फेरी १ जुलैपासून सुरू झाली. २५ वर्षीय चोप्राची पात्रता फेरी काही मिनिटेच चालली. कारण त्याने पहिल्याच प्रयत्नात त्याच्या हंगामातील सर्वोत्तम अंतरावर भाला फेकला आणि ‘अ’ गटातील पात्रता फेरीत तो अव्वल ठरला. अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याकरिता ८३ मीटरचे अंतर पार करणे आवश्यक होते. त्यामुळे ८९.९४ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी खात्यावर असलेल्या चोप्राने आणखी एकही भालाफेक न करता स्पर्धेचे मैदान सोडले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version