पुण्यात मनसेच्या मुसलमान नेत्याचा राजीनामा

पुण्यात मनसेच्या मुसलमान नेत्याचा राजीनामा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसेच्या मुसलमान नेत्याने राजीनामा दिला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांना उत्तर म्हणून हनुमान चालिसा लावू असे म्हटले होते. त्यामुळे भोंग्याच्या राजकारणामुळे मनसेची अडचण होईल का? असा सवाल उपस्थित होत आहे.

राज ठाकरे यांनी मुस्लीम समाजाविरोधात केलेल्या भाषणामुळे मुसलमान समाज नाराज झाला आहे. पूर्वी पक्षाची भूमिका वेगळी होती. पक्षाची भूमिका बदलल्यामुळे राजीनामा देत असल्याचे नेत्याचे म्हणणे आहे. त्यामुळे मनसे नेते माजिद शेख या मुसलमान नेत्याने राजीनामा दिला आहे.

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादाची आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदींवरील भोंगे बंद झाले नाही तर मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर मनसे नेत्यांनी याची अंमलबजावणी सुरू केली.

नाशिकच्या भद्रकाली परिसरात मनसेने लावले भोंगे

राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिक आक्रमक झाले असून नाशिकच्या भद्रकाली परिसरात मनसेने हनुमान चालीसा लावत राज ठाकरे यांच्य आदेशाचे पालन केले. तसेच शहरात अनेक भागांमध्येही हनुमान चालीसा लावण्याचे नियोजन करण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version