भाजप आमदारांची बैठक

भाजप आमदारांची बैठक

राज्यसभा निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनीकुमार वैष्णव भाजपच्या बैठकीसाठी पोहोचले आहेत. आज भाजप आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे त्यात मतदान कसं करावं याबद्दल प्रशिक्षण दिले जाणार आहे देवेंद्र फडणवीस हॉटेल ताज प्रसेनडेंटला पोहचले आहेत.  भाजप आमदारांच्या बैठकीला सुरूवात झालेली आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या शक्तीप्रदर्शनानंतर भाजपच्या विजयाच्या आशा मावळल्याची चर्चा असतानाच आता पक्षासाठी एक ‘पॉझिटिव्ह’ बातमी समोर आली आहे. राज्यात भाजपच्या जहाजाचे सुकाणू एकहाती हाकणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता राज्यसभा निवडणुकीत भाजपसाठी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ट्विट करून त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती दिली. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस होम क्वारंटाईन झाले होते, त्यांच्यावर औषधोपचार सुरु होते.

त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीला अवघे काही तास उरले असताना भाजप आमदारांचा उत्साह वाढणार आहे. तसेच आता शेवटच्या क्षणी देवेंद्र फडणवीस राजकीय चमत्कार करुन राज्यसभा निवडणुकीचे पारडे भाजपच्या बाजूने झुकवणार का, हे पाहावे लागेल. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल नेगटिव्ह आला आहे. आता या भाजपा आमदारांच्या बैठकीत काय डावपेच रचले जाणार ? काय काय निवडणुकीसाठी तयारी केली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version