‘या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि पाच सुपर मुख्यमंत्री आहेत’

‘या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि पाच सुपर मुख्यमंत्री आहेत’

राज्यात टाळेबंदी शिथिल करण्यासंबंधी झालेल्या गोंधळावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली असून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे, असं फडणवीस म्हणाले आहेत. मंत्र्यांनी धोरणात्मक निर्णय विचार करुन जाहीर करावेत असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

‘ज्या मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे त्यांच्याकडून कोणतंही वक्तव्य येत नाही आणि त्याआधी पाच मंत्री वक्तव्य करतात. प्रत्येक मंत्री जाहीर करतो, मुख्यमंत्री घोषणा करतील असं सांगतो. महाविकास आघाडीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. काम करुन तरी ते श्रेय घ्यावं. याआधीही अनेकदा असा गोंधळ झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे. बोलण्यावर बंधनं आणू नये पण किमान मोठ्या धोरणात्मक निर्णयावर सरकारचं म्हणणं आहे ते स्पष्टपणे आणि थेट जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे’, असं फडणवीस म्हणाले आहेत.

‘इतका गोंधळ निर्माण झाला आहे की, टाळेबंदी आहे की नाही यासंदर्भात अनेकांचे फोन आले. आमच्याकडेही त्याचं उत्तर नव्हतं. सध्या लोकांमध्ये संभ्रम, उत्कंठा, निराशा आहे. त्यामुळे काल घोषणा झाल्यानंतर लोकांना वाटलं झालं सुटलो. छोट्या दुकानदारांना निर्बंध संपले असं वाटलं. अनेक दुकानदारांचा ७ ते २ या वेळेला विरोध असून ९ ते ४ करावी अशी मागणी आहे. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. सरकारनं या बाबतीत लक्ष देण्याची गरज आहे’, असंदेखील फडणवीस यावेळी म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version