बांगलादेशचे तीन प्रमुख फलंदाज बाद

भारताने बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतासाठी फायद्याचा ठरला.
बांगलादेशचे तीन प्रमुख फलंदाज बाद

कानपूर : भारताने बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतासाठी फायद्याचा ठरला. आकाशदीपने बांगलादेशच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. नंतर अश्विनने बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याला पायचीत केले. यामुळे अवघ्या ८० धावा झाल्या असताना बांगलादेशचे तीन प्रमुख फलंदाज बाद झाले. 

सलामीवीर झाकीर हसन शून्य धावा करुन यशस्वी जयस्वालकडे झेल देऊन परतला. तर शदमान इस्लाम २४ धावा करुन पायचीत झाला. या दोघांना आकाशदीपने बाद केले. नजमुल हुसेन शांतो ३१ धावा करुन अश्विनच्या चेंडूवर पायचीत झाला. 

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईत झाला. हा सामना जिंकून भारताने मालिकेत १ – ० अशी आघाडी घेतली. पाठोपाठ कानपूर कसोटीत दमदार सुरुवात करुन भारताने बांगलादेशवरील दबाव वाढवला आहे. 

भारत विरुद्ध बांगलादेश दोन कसोटी सामन्यांची मालिका
चेन्नई कसोटी : भारताचा २८० धावांनी विजय
कानपूर कसोटी : खेळ सुरू आहे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version