John Abraham:मोठी बातमी! आता जॉन अब्राहमचीही क्रिकेटविश्वात एन्ट्री; ‘या’ संघाचा बनला सहमालक

आता जॉन अब्राहम त्यांच्या सोबत या फ्रँचायझीच्या व्यवस्थापनात सहभागी झाला आहे.
John Abraham:मोठी बातमी!  आता जॉन अब्राहमचीही क्रिकेटविश्वात एन्ट्री; ‘या’ संघाचा बनला सहमालक

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने आता क्रिकेट विश्वातही दमदार पाऊल टाकले आहे. जॉन अब्राहम याने युरोपियन टी-20 प्रीमियर लीग (ETPL) मधील रॉटरडॅम डॉकर्स (Rotterdam Dockers) या फ्रँचायझीचा सहमालक म्हणून प्रवेश केला आहे. यामुळे युरोपमध्ये क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेला आणखी बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.

रॉटरडॅम डॉकर्सच्या मालकी गटात आधीच दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज क्रिकेटपटू फाफ डू प्लेसिस, जॉन्टी रोड्स आणि हेन्रिक क्लासेन यांचा समावेश आहे. आता जॉन अब्राहम त्यांच्या सोबत या फ्रँचायझीच्या व्यवस्थापनात सहभागी झाला आहे.

हेही वाचा – FIFA World Cup 2026 Marathi Post Viral : फिफाच्या ऑफिशियल पेजवर मराठीचा बोलबाला; मेस्सी-रोनाल्डोच्या फोटोंना दिलेल्या भन्नाट मराठी कॅप्शनने सोशल मीडियावर उडवली धूम 

जॉन अब्राहमने यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "क्रिकेट हा लोकांना एकत्र आणणारा खेळ आहे. युरोपमध्ये क्रिकेटच्या विकासासाठी ETPL मोठी संधी आहे आणि या प्रवासाचा भाग बनताना मला आनंद होत आहे."

युरोपियन टी-20 प्रीमियर लीगचा पहिला हंगाम 26 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर 2026 या कालावधीत खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत नेदरलँड्स, आयर्लंड, स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडमधील सहा फ्रँचायझी सहभागी होणार आहेत. 32 सामन्यांच्या या स्पर्धेद्वारे युरोपमधील नवोदित क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. जॉन अब्राहम यापूर्वीही क्रीडा क्षेत्रात सक्रिय असून, तो इंडियन सुपर लीगमधील फुटबॉल क्लबमध्ये गुंतवणूकदार आहे. आता क्रिकेटमधील त्याच्या या नव्या इनिंगकडे क्रीडाप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version