जेईई परीक्षा लांबणीवर

जेईई परीक्षा लांबणीवर

केंद्रीय संस्थांमधील अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई परीक्षा पुढे ढकलली आहे. जेईई परीक्षा जवळपास दोन महिने पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानुसार, जेईई परीक्षेचे पहिले सत्र जूनमध्ये तर दुसरे सत्र जुलैमध्ये होणार आहे.

अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक एनटीएच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

जेईई परीक्षेचे पहिले सत्र २१ एप्रिल ते ४ मे या कालावधीत होणार होते. मात्र, सुधारित वेळापत्रकानुसार, जेईई परीक्षा आता २० ते २९ जून दरम्यान होणार आहे. तसेच, दुसऱ्या सत्रातील परीक्षा २४ ते २९ मे या कालावधीत घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, ही परीक्षा आता २१ ते ३० जुलै या कालावधीत होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version